पोस्ट्स

भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्य आणि गुलामगिरी

भारताच्या इतिहासातील स्वातंत्र्य आणि गुलामगिरी या गुंतागुंतीच्या आणि सापेक्ष गोष्टी आहेत. भारताला निर्विवाद स्वातंत्र्य 1947 साली मिळाले. अर्थात यावरही काही लोकांचा आक्षेप आहे. पण ती गोष्ट बाजूला ठेवू. 1947 पूर्वी भारत इंग्रजांच्या गुलामीत होता हे सत्य आहे. पण महत्वाचा प्रश्न असा आहे की, इंग्रज भारतात येण्यापूर्वी तरी भारत स्वतंत्र होता काय? याचे उत्तर देणे एवढी सोपी गोष्ट नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विद्वानाच्या मते भारताचा इतिहास हा निरंतर पराभवाचा आणि गुलामगिरीचा इतिहास आहे. म्हणजे भारत याआधी कधीच स्वतंत्र नव्हता. सावरकरांच्या मते, भारतात मुस्लिम राजवटी येण्याअगोदर भारत स्वतंत्र होता. मध्यंतरी मुस्लिम राजवटींच्या काळात तो पारतंत्र्यात गेला. पुन्हा मराठ्यांनी तीन चतुर्थांश भारत स्वतंत्र केला. पण नंतर इंग्रजांनी मराठ्यांना हरवून पुन्हा भारत गुलाम केला. मुसलमान इतिहासकारांच्या मते भारत इंग्रजांच्या काळात म्हणजे फक्त दीडशे वर्षे गुलामीत होता. बाकी काळ तो स्वतंत्रच होता.     एकाच भारताच्या इतिहासाविषयी अशी तीन मते का दिसतात. याचे कारण लोकांच्या वेगवेगळ्या समूहानुसार स्व